काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळे यांचे निधन

सोलापूर | १६ सप्टेंबर २०२५
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे
मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्या ८६ वर्षांच्या होत्या.
राजकीय वाटचाल
- सुरुवातीला
नगरसेविका म्हणून राजकारणात प्रवेश
- १९७२ ते १९७६
दरम्यान सोलापूर जुन्या शहर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार
- १९८२ मध्ये भावजी
ॲड. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर
आमदार
- सोलापूर शहर
काँग्रेसच्या वरिष्ठ मार्गदर्शक नेत्यांपैकी एक
- शैक्षणिक संस्था
उभारून सामाजिक क्षेत्रात योगदान
शेवटचा
प्रवास
गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणापासून दूर होत्या.
मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज चौक
परिसरातील तोरणा बंगला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोलापूरच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या निर्मलाताई ठोकळ
यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह संपूर्ण जिल्हा राजकीय व सामाजिक क्षेत्रात
शोककळा पसरली आहे.