चिंचोली एमआयडीसीत अग्नितांडव

मोहोळ, दि. ३-

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कारखान्याला शुक्रवारी भीषण आग लागली. या अग्नितांडवात कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या ज्वाळा सात ते आठ किमी अंतरावरुन तर धुराचे लोळ सुमारे २० किमीवरुन दिसत होते. चिंचोलीकाटी येथील वसाहतीमधील औद्योगिक केमिकल कारखान्याचे आगीत मोठे नुकसान सोमनाथ नगर येथे एल अॅन्ड जी तुळजाई असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. कोंडी ते बीबी दारफळ या रस्त्यावर असलेल्या या कारखान्यात कंपन्यांना लागणारे केमिकल उपलब्ध होते. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केले. २०० ते ३०० फुटाच्या आगीच्या ज्वाळा व धुराचे लोळ निर्माण झाले होते. तसेच कंपनीत असलेले केमिकलचे बॅरल उडाल्याचा आवाज ५ किमी अंतरापर्यंत ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर | चिंचोली एमआयडीसीतील सोलापूर शहरातील आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले.