शेतकऱ्यांनी सेंद्रिय धान्ये व कृषी उत्पादने पिकवावे - मंत्री शिवानंद पाटील
विजयपूर : “विषमुक्त अन्न उत्पादने यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय धान्ये व कृषी उत्पादने पिकवून आर्थिक सबलीकरण साधावे. ग्रामीण युवक शेतकरी व महिला शेतकरीही यामध्ये पुढाकार घेऊन कार्य करावे,” असे वस्त्रोद्योग, ऊसविकास, साखर व कृषी बाजार समितीचे मंत्री शिवानंद पाटील यांनी आवाहन केले. बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगुळी येथील रेड्डी फार्ममध्ये सेंद्रिय बेल्ल (गूळ) उत्पादन करणाऱ्या आळेमणेला प्रारंभ करून ते बोलत होते. “स्वातंत्र्यानंतर भारतातील ग्रामीण उद्योग हे लघुउद्योगांवरच अवलंबून होते. त्यामुळे देशाच्या ग्रामीण विकासात हातभार लावणाऱ्या लघुउद्योगांच्या प्रगतीस सहकारी क्षेत्राचे योगदान मोठे आहे,” असे ते म्हणाले. “स्वातंत्र्यानंतर भारतात काही मोजक्या मोठ्या उद्योगपतींव्यतिरिक्त मोठ्या उद्योगांची कमतरता होती. गूळ स्वयंपाक तेल, वस्त्रे अशा उत्पादनांद्वारे सक्षम भारताची उभारणी करण्यात लघुउद्योगांनी मोठी भूमिका बजावली आहे. ग्रामीण उद्योग वाढवून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्याचे श्रेय ग्रामीण लघुउद्योग व सहकारी क्षेत्राला जाते,” असेही त्यांनी सांगितले.
“सध्याच्या काळात विषमुक्त धान्य उत्पादन करणे अवघड झाले आहे. गूळ, साखर यांसारखी अन्नपदार्थही रसायनयुक्त आणि विषारी झाले आहेत. त्यामुळेच समाजात मधुमेहाचा प्रसार वाढला आहे,” असे त्यांनी सांगितले राज्यात ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात सुरू असलेल्या दरनिश्चितीच्या समस्येमुळे भविष्यात उद्योजक कर्नाटकात साखर कारखाने सुरू करणे टाळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साखरमंत्री म्हणून या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्न करत आहे,” असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत गूळ उत्पादन करणाऱ्या आळेमणेंची मोठी मागणी वाढेल. विशेषतः सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवून रसायनमुक्त गूळ तयार केल्यास अशा उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतील आणि विषमुक्त गूळ उत्पादन करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मनगुळीसारख्या ग्रामीण भागात सेंद्रिय शेतीत कार्यरत असलेल्या अश्विनी चंद्रशेखर रेड्डी यांनी आधी कोल्ड-प्रेस्ड तेल उत्पादनाला सुरुवात केली आणि आता सेंद्रिय गूळ उत्पादनालाही सुरूवात केली आहे. ग्रामीण महिला कृषीआधारित लघुउद्योगात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत हे कौतुकास्पद आणि जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल,” अशी प्रशंसा केली मनगुळी येथील अभिनव संगनबसव श्रींची उपस्थिती लाभली. विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चंद्रशेखरगौड पाटील, संयुक्त पाटील, सहकारी क्षेत्रातील नेते आय. सी. पटनशेट्टी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आर. एस. पाटील कुचबाळ, प्रभाग प्रमुख प्रभू देसाई, सुरेश हारीवाल, शिवनगौड गुज्जगोंड, कृषी विभागाचे संयुक्त संचालक शिवनगौड पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आळेमणेच्या स्थापिका अश्विनी चंद्रशेखर रेड्डी यांनी स्वागत केले. चंद्रशेखर रेड्डी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नगर पंचायत सदस्य भाग्यराज सोंननाद यांनी आभार मानले.