लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC बंधनकारक; 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख घोषित

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आल्याने राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी e-KYC बंधनकारक केली आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक होऊन खरी पात्र महिलांनाच आर्थिक लाभ मिळेल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.राज्य सरकारने 18 सप्टेंबर 2025 पासून या योजनेसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू केली आहे. आतापर्यंत बहुतांश लाभार्थी महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 ई-केवायसी कशी कराल?

1  https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
2 लॉगिन करून “e-KYC” पर्याय निवडा.
3 आपला आधार क्रमांक आणि Captcha Code टाकून Send OTP वर क्लिक करा.
4 आलेला OTP टाकून Submit करा.
5 जात प्रवर्ग निवडा आणि दिलेल्या घोषणांवर (Declaration) टिक करा:

  • माझ्या कुटुंबातील कोणीही सरकारी कायमस्वरूपी नोकरीत नाही.
  • माझ्या कुटुंबातील फक्त १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
    6  सर्व माहिती भरल्यानंतर Submit करा.
    7 “
    Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

महत्वाची तारीख:

🔸 e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख – 18 नोव्हेंबर 2025