डॉ.सुधीर प्रकाशराव कुलकर्णी यांना विद्यावाचस्पती

सोलापूर : संगमेश्वर
कॉलेज, मानसशास्त्र विभागाच्या संशोधन केंद्रातील संशोधक डॉ. सुधीर प्रकाशराव
कुलकर्णी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने
मानव्यविद्याशाखे अंतर्गत पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय “RESILIENCE
AS PREDICTIVE FACTOR OF PERSONAL STRESS, AGGRESSIVE BEHAVIOUR AND WORKPLACE
WELL BEING OF POLICE IN SOLAPUR DISTRICT” हा होता. त्यांना डॉ. पी. एस. बनसोडे यांचे मार्गदर्शन
लाभले. कुलकर्णी यांच्या मौखिक परीक्षेसाठी बहिस्थः परीक्षक म्हणून म्हैसुर
विद्यापीठाचे प्राध्यापक संपथकुमार अंगडी तर अध्यक्षस्थानी मानव्यविद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे हे मान्यवर उपस्थित होते. कुलकर्णी यांच्या यशाबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.
धर्मराज काडादी, सचिवा प्रा. ज्योती काडादी, संगमेश्वर
कॉलेजचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. दर्गोपाटील तसेच
प्रा. मेटील, प्रा कतनाळे, प्रा. मस्के,
प्रा. तुपेरे, प्रा. अनंत कुलकर्णी, प्रा. मुंगुसकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा
यांनी गौरव केला तर सोलापूरचे पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांनी विशेष कौतुक
करुन या पीएच.डी. मधील शिफारसींचे उपयोजन कसे अंमलात आणले जातील यावर चर्चा केली.