महाराष्ट्रात दुहेरी भीषण अपघात : जालना व चंद्रपूर जिल्ह्यात मिळून 11 जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. राजुर–टेंभुर्णी रस्त्यावरील गाढेगव्हाण फाट्यावर भरधाव कार ७० फूट खोल विहिरीत कोसळली, यात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे भरधाव वेगाने जाणारी कार मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीला धडक दिल्यानंतर विहिरीचे कठडे तोडून थेट पाण्यात कोसळली.

मृतांची ओळख पटली
या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये –

  • ज्ञानेश्वर डकले
  • पद्माबाई भांबीरे
  • निर्मलाबाई डकले
  • ज्ञानेश्वर भांबीरे
  • आदिनाथ भांबीरे

सर्वजण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.

पोलीस व बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह व कार बाहेर काढण्यात यश आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.