गाझा शांतता परिषदेत ट्रम्प यांचं मोदी आणि भारतावर कौतुक; "भारत महान देश, मोदी माझे चांगले मित्र"

इजिप्त : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इजिप्तमध्ये झालेल्या गाझा शांतता शिखर परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले.
ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख “महान देशअसा करताना मोदींना “माझे खूप चांगले मित्रअसे संबोधले. विशेष म्हणजे, ट्रम्प हे वक्तव्य करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ त्यांच्या अगदी मागे उभे होते.

परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले —

भारत एक महान देश आहे, ज्याच्या शीर्षस्थानी माझे एक खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी शानदार काम केले आहे.”

यानंतर त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आशावाद व्यक्त करत म्हटलं,

मला वाटतं की पाकिस्तान आणि भारत भविष्यात एकत्र चांगल्या प्रकारे राहतील.”

इतकंच नव्हे तर ट्रम्प यांनी बोलत असतानाच मागे उभ्या असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांकडे वळून मिश्किलपणे विचारलं,

बरोबर ना?”

यावर शहबाज शरीफ यांनी हलकं हसत मान हलवली आणि “हो” असं उत्तर दिलं.
ट्रम्प आणि शरीफ यांच्यातील हा संवाद आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.