चीनच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा संताप; १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १००% कर लादण्याची घोषणा
वॉशिंग्टन, 11 ऑक्टोबर 2025 —
चीनने दुर्मीळ पृथ्वी खनिजांच्या (Rare Earth Minerals) निर्यातीवर निर्बंध घातल्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प यांनी चीनवर मोठी आर्थिक कारवाई जाहीर केली आहे. त्यांनी १ नोव्हेंबरपासून
चिनी वस्तूंवर १००% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली.
ट्रम्प यांनी Truth Social या सोशल मीडियावर लिहिले,
“चीनने ही अभूतपूर्व भूमिका घेतल्यामुळे, अमेरिका
चीनवर सध्या देत असलेल्या कोणत्याही करांव्यतिरिक्त १००% अतिरिक्त कर लादेल.” चीनने
रेअर अर्थ मेटल्सच्या निर्यातीवर नियम कडक केल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त
केला आहे. त्यांनी म्हटले की, “चीनने अचानक निर्यात नियंत्रण
आणले, आणि कोणालाच त्याची कल्पना नव्हती. जर चीनने हे
नियंत्रण मागे घेतले, तरच आम्ही या शुल्काचा पुनर्विचार
करू.”
या नव्या व्यापार धोरणामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या
अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्धाचे सावट पुन्हा निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी
जाहीर केलेल्या या नियमांनुसार, अमेरिकेत येणाऱ्या सर्व प्रमुख चिनी
उत्पादनांवर आणि सॉफ्टवेअर निर्यातीवर नियंत्रण आणले जाईल. हे नियम १
नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. ट्रम्प यांनी तसेच स्पष्ट केले की, ते APEC शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी
जिनपिंग यांची भेट घेणार आहेत, परंतु ती नक्की होईलच याची
खात्री नाही. दरम्यान, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी
घोषित केलेल्या नव्या नियमांनुसार, दुर्मीळ मृदा घटक (rare
earth elements) किंवा त्यांचे अल्प प्रमाण असलेल्या वस्तूंच्या
निर्यातीसाठी विशेष परवानगी आवश्यक असेल. चीनने हे पाऊल “राष्ट्रीय सुरक्षेच्या
रक्षणासाठी” उचलल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाचा परिणाम संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स आणि
तंत्रज्ञान क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे, कारण जगातील
बहुतेक दुर्मीळ खनिजांचे उत्पादन चीनकडे केंद्रित आहे.