चीनमध्ये १८ तास डिटेन्शन… अरुणाचलची पेमा वांग थोंगडोक ट्रोलर्सवर भडकल्या; “भारत सरकारची कारवाई सर्व भारतीयांच्या हिताची”

अरुणाचल प्रदेशातील पेमा वांग थोंगडोक या महिलेला चीनमध्ये ताब्यात ठेवण्यात आल्यानंतर आता ती ट्रोलर्सवरही भडकली आहे. शांघाय विमानतळावर तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनानंतर तिने भारतीयांना एकतेचा संदेश दिला असून, भारत सरकारची कारवाई ही तिच्यासाठी नसून सर्व भारतीयांच्या हितासाठी आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

 शांघाय विमानतळावर नेमकं काय घडलं?

थोंगडोक २१ नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला प्रवास करत असताना तिची फ्लाइट शांघायमध्ये तीन तासांसाठी थांबली. मात्र, इमिग्रेशनदरम्यान चिनी अधिकाऱ्यांनी तिचा भारतीय पासपोर्ट मान्य करण्यास नकार दिला. त्यांनी तिच्या जन्मस्थळाचा — अरुणाचल प्रदेशाचाभारताचा भाग म्हणून स्वीकार करण्यास नकार देत तो चीनचा प्रदेश असल्याचा दावा केला. या वादानंतर तिला तब्बल १८ तास ताब्यात ठेवण्यात आले. ही घटना भारताच्या सार्वभौमत्वाचा मोठा अपमान असल्याची प्रतिक्रिया तीने दिली आहे.लोकांच्या पाठिंब्याबद्दल आभारी, पण ट्रोलर्सला वेळ नाही” पेमा वांग थोंगडोक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले— या राजनैतिक मुद्द्यावर मला सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. मी वित्तीय सेवांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. माझ्याकडे ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी वेळ नाही.” ती म्हणाली की योग्य लोक परिस्थिती समजून घेतात आणि जे समजून घेत नाहीत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही.

🇮🇳भारत सरकारची कारवाई माझ्यासाठी नाही, तर सर्व भारतीयांसाठी”

थोंगडोकने पुढे स्पष्ट केले— मी भारतात राहत नाही. त्यामुळे भारत सरकार जे काही करते ते माझ्यासाठी नाही,
तर भारतातील प्रत्येक नागरिकाच्या आणि अरुणाचलच्या लोकांच्या सुरक्षेसाठी व अभिमानासाठी आहे.
आपण एक राष्ट्र आहोत आणि नेहमी एकमेकांच्या बाजूनेच उभे राहू.” तिच्या या वक्तव्याने हजारो भारतीयांनी सोशल मीडियावर पाठिंबा व्यक्त केला आहे.