हुतात्मा नगरी सोलापूरमध्ये माकपाचे राज्यस्तरीय राजकीय अभ्यास शिबिर!

देशाच्या इतिहासात क्रांतिकारी वारसा लाभलेले, क्रांतिकारकांची भूमी असलेले सोलापूर जिल्हा प्रथमच भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) राज्य समितीच्या वतीने एका भव्य राजकीय अभ्यास शिबिराचे यजमानपद भूषवणार आहे. शाखा सचिवांसाठी आयोजित हे तीन दिवसीय शिबिर कुंभारी येथील रे नगर येथे शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट ते रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन माकपाचे माजी राज्य सचिव व केंद्रीय समिती सदस्य, माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान माकपाचे राज्य सचिव डॉ. कॉ. अजित नवले भूषवतील. मार्क्सवादी विचारांचा सोलापुरातील वारसा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरमध्ये मार्क्सवादी विचारधारेवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळ व कामगार चळवळ जोपासली. कॉ. नारायणराव आडम, रमणय्या दिड्डी, कोमरय्या यलगेटी व कॉ. नबिखा बेरिया व अन्य लढाऊ कार्यकर्त्यांनी मिळून १९६५ साली सोलापुरात माकपाची पहिली शाखा स्थापन केली. त्यानंतर पक्षाने कामगारांच्या प्रश्नांवर ऐतिहासिक व निर्णायक लढे उभे केले. त्या लढ्यांची परंपरा आजही कायम आहे.

सध्याची राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी २०१४ नंतर देशात आणि महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता, सामाजिक-आर्थिक विषमता वाढली आहे. सांप्रदायिकता, धर्मांधता आणि जातीयतेच्या आधारावर अराजकता माजलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुद्दाम थांबवून लोकशाही प्रक्रियेची गळचेपी केली जात आहे. अस्मितेच्या नावाखाली जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या परिस्थितीत सत्ताधारी महायुतीला सत्तेतून पायउतार करून विकासाला नवे पर्व देणे हाच पर्याय असल्याचा संदेश या अभ्यास शिबिरातून दिला जाणार आहे.

मार्गदर्शन करणारे विचारवंत व नेते

या शिबिरात खालील विषयांवर सखोल वैचारिक मंथन होणार आहे –

 माकपाचा जाहीरनामा

 भांडवली अर्थव्यवस्था

साम्राज्यवादी धोरणे

 भारतातील सांप्रदायिकता व धर्मांधता

 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीया विषयांवर प्रा. अजित अभ्यंकर, , डॉ. उदय नारकर, डॉ. अजित नवले, ज्येष्ठ हिंदी सायित्यिक कॉ. बादल सरोज, यांसह महाराष्ट्रातील पुरोगामी, लोकशाही, समाजवादी व मार्क्सवादी विचारवंत मार्गदर्शन करतील. तर विशेष सत्रामध्ये माकपाचे पॉलिटब्युरो सदस्य कॉ. प्रकाश करात व डॉ. अशोक ढवळे मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.

 शिबिराची वैशिष्ट्ये :- महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांतून २७० शाखा सचिव व लढाऊ कार्यकर्त्यांचा सहभाग

 २२ ऑगस्ट रोजी लाल सलामी व ध्वजारोहणाने भव्य सुरुवात

रे नगरच्या प्रशस्त प्रांगणात हजारो लाल सैनिकांची हजेरी  या तीन दिवसीय शिबिरातून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे भांडवलविरोधी, समाजवादी, लोकशाही मूल्यांचे पर्व सुरू होईल, असा विश्वास माकपाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी व्यक्त केला.  कॉ एम एच शेख,,नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, म.हनीफ सातखेड, सुनंदा बल्ला, ॲड.अनिल वासम, कॉ.दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती.