'खालिद का शिवाजी' सिनेमावर वादाची सावट — उद्याच्या प्रदर्शनावर अनिश्चितता

खालिद का शिवाजी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला
आहे. ८ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता असली तरी, हिंदू महासंघासह विविध संघटनांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली
आहे. |
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका
संवादावरून वाद निर्माण झाला आहे. ट्रेलरमध्ये सांगण्यात आलं आहे की:
"शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी ३५% मुस्लिम
होते."
या संवादावर शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, इतिहासाचे
विकृतीकरण केल्याचा आरोप केला आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून चित्रपटाचे पुनर्परीक्षण
करण्याची विनंती केली आहे.
दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया - राज मोरे
"अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरून निष्कर्ष काढणे
योग्य नाही. आधी चित्रपट पाहा, मग बोला,"
असं म्हणत दिग्दर्शक राज मोरे यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
तसेच त्यांनी स्पष्ट केलं की,
"हा ऐतिहासिक चित्रपट नाही. हा खालिद नावाच्या
मुलाच्या दृष्टीकोनातून मांडलेला कथानक आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम
होते, ही इतिहासात नोंद आहे, टक्केवारीत
थोडं कमी-जास्त असू शकतं."
विरोध कायम
सिनेमावर बंदीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
- शिवप्रेमी संघटनांचे आंदोलन
- सिनेमातील इतिहासाच्या सादरीकरणावर सवाल
- प्रदर्शन थांबवण्याची शक्यता
८ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार की नाही, याकडे
आता सर्वांचे लक्ष लागले आहे.