श्रीरामपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण; निर्जन ठिकाणी बेदम मारहाण, शहरात तणाव
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी
(२६ नोव्हेंबर २०२५) सकाळी मोठी धक्कादायक घटना घडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन
गुजर यांचे काही अज्ञात व्यक्तींनी कारमधून अपहरण करून निर्दय मारहाण केली. ही
घटना सकाळी सुमारास सातच्या दरम्यान घडली असून संपूर्ण शहरात प्रचंड संतापाची लाट
पसरली आहे.
घटना
कशी घडली?
सचिन गुजर सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले
होते. त्याचवेळी एक कार येऊन थांबली आणि आरोपी त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी
गुजर यांना बेदम मारहाण केली आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवत टिळकनगर परिसरातील
निर्जन स्थळी घेऊन गेले. तेथेही त्यांना मारहाण केल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा
सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
काँग्रेसचे
आरोप आणि संतप्त प्रतिक्रिया
घटनेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे
आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सासणे,
आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर
आंदोलन सुरू केले आहे.
त्यांची प्रमुख मागणी:
- आरोपींवर अपहरणाचा
गुन्हा नोंदवा
- निवडणुकीत दहशत
निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
आमदार ओगले यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले—
“निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसच्या
तीन उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल झाले. अर्ज मागे घ्यावा म्हणून धमक्या दिल्या
जात आहेत.” ते पुढे म्हणाले की गुजर यांचे अपहरण करणारे स्वतःला हिंदुत्ववादी
म्हणवतात, परंतु हा “छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार नाही.”