व्यावसायिक गॅस सिलिंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त; घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल नाही .

हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक
क्षेत्रांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आजपासून लागू झाला आहे. ऑइल मार्केटिंग
कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या
दरात कपात केली आहे.
🔹 व्यावसायिक सिलिंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त
- व्यावसायिक
सिलिंडरच्या किंमतीत ५१.५० रुपयांनी कपात झाली आहे.
- राजधानी दिल्लीमध्ये
आता एका सिलिंडरची किंमत १५८० रुपये इतकी झाली आहे.
- मुंबईसह देशभरात
आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
🔹 घरगुती गॅस सिलिंडर 'जैसे थे'
- व्यावसायिक LPG गॅसच्या किंमतीत सातत्याने घसरण
होत असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही.
- शेवटचा दरबदल ८
एप्रिलला झाला होता.
- सध्या १४ किलो
वजनाचा घरगुती सिलिंडरचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
- मुंबई: ₹८५२.५०
- दिल्ली: ₹८५३
- चेन्नई: ₹८६८
- कोलकाता: ₹८७९