पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने महापूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, शेती व घरांचे मोठे नुकसान

पाचोरा (जि. जळगाव) | १६ सप्टेंबर २०२५
सोमवारी रात्री पाचोरा तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य
पावसामुळे घाट माथ्यावरील नद्यांना मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये
पाणी शिरले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रभावित
गावे
- वरखेडी : बहुळा नदीला मोठा पुर; शेतांचे मोठे नुकसान
- शिंदाड, वडगाव कडे, राजुरी,
वाडी शेवाळे, सार्वे पिंप्रि : घरांमध्ये पाणी शिरून संसार
उपयोगी वस्तू वाहून गेल्या
- निभोरा : नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले,
वाहतुकीवर परिणाम
पूरस्थिती
- अनेक गावांचा
संपर्क तुटला, पूल
पाण्याखाली गेले
- ग्रामस्थांनी मिळेल
त्या ठिकाणी आसरा घेत रात्र काढली
- बऱ्याच वर्षांनंतर
इतका मोठा पूर
खानदेश–मराठवाडा
संपर्क तुटला
- सातगाव डोंगरी व सार्वे गावांचा पाचोराशी संपर्क तुटला
- पिंप्री गावात
पूरपाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला; गाव थोडक्यात वाचले
- नागरिक रात्रीपासून
जागे राहून पूरस्थितीवर लक्ष ठेवून
शाळांना
सुट्टी
शिंदाड मंडळातील १५ गावांतील शाळांना मंगळवारी सुट्टी
जाहीर करण्यात आली आहे.