गांधी नाथा रंगजी विद्यालयात बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

सोलापूर :- गांधी नाथा
रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधी नाथा रंगजी विद्यालय सोलापूर
येथे संस्थेचे अध्यक्ष संजय गांधी यांच्या प्रेरणेतून 29 ऑगस्ट या क्रीडा दिनाचे
औचित्य साधून आयोजित केलेल्या बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापिका सरोजना
मुलिंटी यांच्या हस्ते करण्यात आले. या
क्रीडा स्पर्धा 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहेत. यामध्ये पहिली ते
चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी लिंबु चमचा, लंगडी, लिगोरी, दोरीवरच्या उड्या, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, बटाटा शर्यत, बुक बॅलेन्स, 50 मीटर धावणे या स्पर्धा पार
पडणार आहेत. या बाल क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक शिवानंद सुतार, संगिता नरे, गितगंगा दुरुगकर, दिपाली नकाते, मिनाक्षी माने, जयश्री शिंदे, अंजली जाधव, अनिता आवटे, नाहेरा शिलेदार हे परीश्रम घेत
आहेत.