शांतता समिती बैठकीत डॉल्बीबंदीला मध्यवर्ती मंडळांनी दिला पाठिंबा

सोलापूर- सण, उत्सवातील डॉल्बीबंदीला शांतता समितीच्या बैठकीत अनेक मंडळांनी पाठिंबा व्यक्त केला असून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य, गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळांचे पदाधिकारी, ईद ए मिलादचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त, पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, डीजेमुक्त कृती समिती आणि ज्येष्ठ नागरिक समितीचे पदाधिकारी यांचे अभिनंदन
करतो, त्यांनी डीजेबंदीबाबत चांगली पावले उचलली आहेत. सर्व
मंडळांच्या पदाधिकार्यांनी डीजेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पोलीस आयुक्त व
मी एकत्र बसून यावर सकारात्मक निर्णय घेऊ. यावेळी पोलीस आयुक्त एम. राज कुमार
म्हणाले, गणेशोत्सवातील शेवटच्या तीन दिवशी रात्री 12
वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. गणेश मंडळांना ऑनलाइन पध्दतीने परवाने
देण्यात येत असून सुमारे 60 टक्के मंडळांनी यासाठी अर्ज केले आहेत. मंडळांच्या ज्येष्ठ पदाधिकार्यांनी उत्सव
काळात तरुण कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे, सोशल मीडियावरुन
आक्षेपार्ह पोस्ट कोणी टाकणार नाही याची दक्षता घ्यावी, देखावे
सादर करताना अन्य धर्मीयांच्या भावना दुखावणार नाहीत, याची
काळजी घ्यावी. यावेळी ज्येष्ठ नागरिक
संघाचे महादेव माने, दास शेळके, सुनील
रसाळे, विजयकुमार शाबादे, अमोल शिंदे,
दत्ता भोसले, राहुल गंधुरे, ऍड यू. एन. बेरियाआरिफ शेख, हेमा चिंचोळकर, देवेंद्र भंडारे, लता फुटाणे, महेश घाडगे, गौरव
जक्कापुरे, लखन गायकवाड, अॅड. संदीप
बेंद्रे, मतीन बागवान, श्रीनिवास
म्हेत्रे, अनिता पवार, प्रियांका भोसले
आदींनी विविध विषय मांडले. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त कारंजे, वीज वितरणचे शहर कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील यांनी आपल्या
विभागामार्फत करण्यात येणार्या कामांची माहिती दिली. या बैठकीस ज्येष्ठ विधिज्ञ
धनंजय माने, मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मेंडके,
पद्माकर काळे, श्रीकांत घाडगे, विजय पुकाळे, युवराज पवार आदी उपस्थित होते.