पाथरीत कावड यात्रेत कार घुसली; दोन भाविकांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी
येथे आलेल्या कावड यात्रेत पहाटे भीषण अपघात झाला. परतीच्या मार्गावर असताना सकाळी
अंदाजे ५ वाजता एका कारने थेट यात्रेत घुसून दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर
दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ऋषिकेश अशोक शिंदे (रा. सेलू) आणि एकनाथ
गंगाधरराव गजमल (रा. डासाळा, ता. सेलू) यांचा समावेश आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, जैस्वाल,
थोरे आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले आणि तपास सुरू
आहे. सेलूहून निघालेल्या कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण सेलू शहरात शोककळा पसरली आहे.