सी. पी. राधाकृष्णन यांची भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड

नवी दिल्ली | १२ सप्टेंबर २०२५
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ भाजप नेते सी. पी.
राधाकृष्णन यांनी आज देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्यास माजी उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक निकाल
- एनडीए उमेदवार सी.
पी. राधाकृष्णन – ४५२ मते
- इंडिया आघाडी
उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी – ३०० मते
- विशेष म्हणजे, एनडीएमध्ये नसलेल्या १४
खासदारांनी राधाकृष्णन यांना मत दिले, ज्यामुळे
विरोधकांची मते फुटल्याचे स्पष्ट झाले.
सी. पी. राधाकृष्णन यांचा प्रवास
- जन्म : ४ मे १९५७, तिरुपूर, तामिळनाडू
- शिक्षण : बीबीए
पदवी
- १६ व्या वर्षी राष्ट्रीय
स्वयंसेवक संघात प्रवेश.
- १९९८ आणि १९९९ मध्ये
कोयंबतूर लोकसभेवरून खासदार निवडून आले.
- विविध संसदीय
समित्यांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या.
- २००४-०७ : तामिळनाडू
भाजप अध्यक्ष – ९३
दिवसांची रथयात्रा (१९,००० कि.मी.) काढली.
- २०१६ : कोची येथील
कॉयर बोर्ड अध्यक्ष – नारळ
तागाची निर्यात विक्रमी २,५३२ कोटींवर.
- २०२०-२२ : केरळ भाजप
प्रभारी.
- २०२३ : झारखंड
राज्यपाल, त्यानंतर
तेलंगणा, पुद्दुचेरी, महाराष्ट्राचे
राज्यपाल.
- २०२५ : एनडीएचा
उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार म्हणून निवड.
राजकीय महत्त्व
- राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे स्वयंसेवक म्हणून सुरुवात करून देशाचे उपराष्ट्रपतीपद
भूषवण्यापर्यंतचा प्रवास.
- एनडीएच्या राजकीय
एकजुटीचे आणि विरोधकांच्या मतभंगाचे प्रत्यंतर.