बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे निधन; ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं आज (२४ नोव्हेंबर) निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परिस्थिती लक्षात घेऊन देओल कुटुंबाने त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण देओल कुटुंब, मित्रमंडळी आणि मोठ्या संख्येने चाहते अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात पत्नी हेमा मालिनी, मुलं सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल, तसेच पहिल्या पत्नीपासूनच्या मुली विजेता आणि अजीता असा मोठा परिवार आहे. देओल कुटुंबासाठी धर्मेंद्र हे आधारस्तंभ होते.

सहाज दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. शोले’, ‘दादागिरी’, ‘आग ही आग’, ‘जीने नही दुंगा’, ‘बर्निंग ट्रेन’, ‘धर्म और कानून’ यांसह असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.