कुशीनगर एक्सप्रेसच्या एसी कोचमध्ये ५ वर्षांच्या मुलीचा मृतदेह; मावस भावावर अपहरण व खुनाचा संशय
-resized-to-1000x666.jpeg)
मुंबई :- मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर
एक्सप्रेसच्या एसी कोचमधील टॉयलेटच्या कचरापेटीत एका ५ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने
रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ माजली आहे.
हा मृतदेह बी-२ कोचमधील बाथरूममध्ये एका प्रवाशाला आढळून
आला. त्याने तात्काळ रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. प्राथमिक
तपासानुसार, मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली
असावी अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताच
धक्कादायक बाब समोर आली. मुलीचे अपहरण तिच्याच मावस भावाने केले असल्याचे तपासात
निष्पन्न झाले. सध्या पोलिसांनी घटनास्थळावरील प्रवासी व संबंधित लोकांचे जबाब
नोंदवले असून, अपहरण व हत्या या अँगलने तपास सुरू आहे. घटनास्थळी
भीतीचे वातावरण घटनेची माहिती मिळताच कोचमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने प्रवाशांची चौकशी केली आणि पुरावे गोळा करण्यास
सुरुवात केली आहे. अलीकडील पार्श्वभूमी यापूर्वी नागपूरमध्ये देखील दोन अल्पवयीन
मुली ट्रेनमध्ये सापडल्या होत्या. त्या कोणालाही न सांगता मुंबईच्या दिशेने येत
होत्या. तिकिटाशिवाय प्रवास करत असल्याचे लक्षात आल्यावर टीसीने पोलिसांच्या
स्वाधीन केले होते. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा
एकदा ऐरणीवर आला आहे.