महापालिका निवडणुकीआधी भाजपचा मोठा निर्णय; फडणवीसांचा महायुतीच्या विजयावर विश्वास

मुंबई :- आगामी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्यासाठी पक्षाने महत्त्वाचा निर्णय
घेतला आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) अधिकृत घोषणा
केली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष
शेलार आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की,
- अमित साटम यांनी
पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
- विधानसभेत ते
अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात.
- त्यांना मुंबईच्या
प्रश्नांची सखोल जाण आहे.
- त्यांच्या
नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येईल.