भारत सरकारचा मोठा निर्णय : नेपाळ-भूतान नागरिकांना आणि भारतीयांना व्हिसा-पासपोर्टशिवाय प्रवेशाची मुभा

गृह मंत्रालयाने (MHA) जारी केलेल्या नव्या आदेशात मोठा बदल जाहीर केला आहे. नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना तसेच भारतीय नागरिकांना या शेजारील देशांतून भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा व्हिसा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.

आदेशातील महत्त्वाचे मुद्दे

1.       भारतीय लष्कर, नौदल व वायुदलातील जवानकर्तव्यावर भारतात प्रवेश किंवा बाहेर पडताना पासपोर्ट/व्हिसा आवश्यक नाही.

o    त्यांच्या कुटुंबीयांना देखील सरकारी वाहनातून प्रवास केल्यास सूट लागू होईल.

2.      नेपाळ व भूतान नागरिक

o    रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट/व्हिसाची आवश्यकता नाही.

o    पण जर हे नागरिक चीन, मकाऊ, हाँगकाँग किंवा पाकिस्तान मार्गे भारतात आले तर सूट लागू होणार नाही.

3.      तिबेटी नागरिक

o    भारतात पूर्वी प्रवेश केलेले किंवा आता प्रवेश करणारे तिबेटी नागरिक, जर त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र घेतले असेल तर त्यांनाही सूट लागू होईल.

4.      शेजारील देशांतील अल्पसंख्याक

o    अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान येथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन ज्यांनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतात प्रवेश केला असेल, त्यांना व्हिसा-पासपोर्ट बंधनातून सूट.

5.      श्रीलंकेतील तमिळ नागरिक

o    ९ जानेवारी २०१५ पर्यंत भारतात आश्रय घेतलेल्या नोंदणीकृत तमिळ शरणार्थींना हा नियम लागू होणार नाही.

अधिकृत स्पष्टीकरण

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ही सूट केवळ मर्यादित देश आणि नागरिकांसाठीच आहे. सुरक्षा कारणास्तव काही देशांतून येणाऱ्यांवर कडक नियम लागू राहतील.