सुनेवर बळजबरीचा प्रयत्न; निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, पत्नी व मुलगा फरार

पुणे | १२ सप्टेंबर २०२५
पुण्यातील सहकारनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारात निवृत्त
सहाय्यक पोलिस आयुक्त (६१), त्यांची पत्नी (५६) आणि मुलगा
(३५) यांच्यावर एका ३० वर्षीय विवाहितेने गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीचा
आरोप
- मुलगा नपुंसक
असल्याची माहिती लपवून विवाह लावून दिला.
- मूल व्हावे यासाठी
पती व सासूने तिला सासऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
- २३ जून रोजी सासरा
घरात जबरदस्तीने शिरला आणि सुनेवर बळजबरीचा प्रयत्न केला.
- विरोध केल्यावर तिला
जिवे मारण्याची धमकी दिली.
पार्श्वभूमी
- विवाह : मे २०२५
मध्ये पुण्यात.
- घटना कालावधी : ५ मे
ते २३ जून दरम्यान.
- फिर्यादी : ३०
वर्षीय विवाहित महिला.
पोलिस
कारवाई
- सहकारनगर पोलिसांनी
गुन्हा दाखल केला.
- घटना उघड झाल्यानंतर
आरोपी कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहे.
- तपास : पोलीस
उपनिरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू.