मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

दिल्ली : राजधानीत आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनसुनावणीदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता सिव्हिल लाईन्स येथील सरकारी निवासस्थानी सुरू असलेल्या
जनसुनावणी दरम्यान गर्दीतून एका ३५ वर्षीय व्यक्तीने गुप्ता यांना एक कागद दिला.
त्यानंतर अचानक त्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना कानाखाली मारली आणि केस ओढले. या
घटनेत गुप्ता जखमी झाल्या नसल्या तरी त्यांना धक्का बसला. घटनेनंतर लगेचच उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला
पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक करून
सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात नेले असून चौकशी सुरू आहे. या घटनेचा दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्री
निवासस्थानी डॉक्टरांचे पथक दाखल होऊन गुप्ता यांची वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान, रेखा गुप्ता यांनी २० फेब्रुवारी
२०२५ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला होता. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाशी संबंधित असून, भाजपच्या सरचिटणीस आणि महिला
मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा राहिल्या आहेत.