अभिनेता सुयश टिळकचा कार अपघात; सुरक्षित सुटका, ७ तास महामार्गावरून टो करून मुंबई गाठली

मुंबई, ११ ऑगस्ट २०२५ — मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला
अभिनेता सुयश टिळक अलीकडेच कार अपघातात सापडला. ‘का रे दुरावा’ या मालिकेतून
लोकप्रिय झालेल्या सुयशने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अपघाताची माहिती
दिली. अपघातात तो आणि इतर कोणीही जखमी झाले नाहीत, मात्र
त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. घटना अशा ठिकाणी घडली जिथे त्वरित मदत मिळत
नव्हती. साधारण तासाभरानंतर मदत पोहोचली आणि त्याची गाडी मुंबईपर्यंत टो करून
नेण्यात आली. या प्रवासादरम्यान सुयश 6-7 तास महामार्गावरून,
एसी नसलेल्या बंद गाडीत बसून प्रवास करत होता. लोक त्याच्याकडे पाहत
होते, काही हसत होते, तर काही अंदाज
बांधत होते. या प्रवासाचा आनंद घेत सुयशने पुस्तक वाचले, संगीत
ऐकले, थोडी झोप घेतली आणि मोबाईलवर मिनी व्लॉग तयार केला.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “आयुष्य कधी कधी तुम्हाला
खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास
रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून खोल श्वास घेऊन तो एन्जॉय करू शकता.”