नेपाळ आंदोलनात नवा चेहरा: काठमांडू महापौर व रॅपर बालेंद्र शाह (बालेन) तरुणांचं नेतृत्व करणारे प्रतीक

काठमांडू | सप्टेंबर २०२५
नेपाळमधील सरकारविरोधी आंदोलनामध्ये आता जेन झी’ पिढीचा चेहरा म्हणून काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह (बालेन शाह) पुढे आले आहेत. मूळचे रॅपर गायक आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले शाह यांच्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

 सोशल मीडियावर लोकांचा पाठिंबा

  • अनेक युजर्सनी शाह यांना “नेपाळच्या नव्या पिढीचा प्रतिनिधी” म्हटलं.
  • एका युजरने एक्सवर लिहिलं: प्रिय बालेन, आता वेळ आली आहे... पुढे या आणि नेतृत्वाची धुरा हाती घ्या. संपूर्ण नेपाळ तुमच्यासोबत आहे.”
  • शाह यांनी सध्या आंदोलन शांततेत राहावे, असं आवाहन केलं आहे.

कोण आहेत बालेंद्र शाह?

  • जन्म: १९९०, काठमांडू
  • शिक्षण: सिव्हिल इंजिनिअरिंग (Bachelor) व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स (विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, भारत)
  • करिअर: रॅपर व गीतकार म्हणून सुरुवात, सामाजिक विषमता व भ्रष्टाचारावर गाणी लिहिली. नंतर राजकारणात प्रवेश करून काठमांडूचे महापौर म्हणून निवडून आले.