रशियाच्या कमचटका किनाऱ्यावर ७.४ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका टळला

रशियाच्या पूर्वेकडील कमचटका बेटाजवळ आज सकाळी भीषण भूकंप
झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची
तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे.
भूकंपाची ठळक माहिती
- वेळ : पहाटे २.३७
मिनिटांनी
- केंद्रबिंदू :
कमचटका शहरापासून १११ किमी पूर्वेकडे, उत्तर प्रशांत महासागरात
- तीव्रता : ७.४
रिश्टर स्केल
- नुकसान : अद्याप
कोणतीही जीवितहानी किंवा हानीची नोंद नाही
नागरिकांमध्ये
दहशत
भूकंपाच्या धक्क्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे
वातावरण निर्माण झाले. जुलै महिन्यात या भागात ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप होऊन
त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पुन्हा हादरे बसल्याने नागरिक सावध झाले आहेत.
त्सुनामीचा धोका?
- अधिकाऱ्यांनी
सांगितले की सध्या त्सुनामीचा तातडीचा धोका नाही, मात्र समुद्रकिनारी राहणाऱ्यांना
सतर्क राहण्याचे आवाहन.
- अधिकारी सतत
परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
भूकंपांचा इतिहास
- जुलै २०२५ : ८.८
रिश्टर स्केलचा भूकंप, पॅसिफिक
देशांना त्सुनामीचा इशारा
- २०११ : जपानमध्ये
९.१ तीव्रतेचा भूकंप, विनाशकारी
त्सुनामी
- १९५२ : कमचटका
प्रदेशात ९.० रिश्टर स्केलचा ऐतिहासिक भूकंप