बंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या ७.१ कोटींची लूट; आरबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून दरोडा

बंगळुरू : दक्षिण बंगळुरूमध्ये बुधवार दुपारी दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी दरोड्यात तब्बल ७.१ कोटी रुपयांची लूट करण्यात आली. दरोडेखोरांनी स्वत:ला RBI चे अधिकारी म्हणून ओळख करून, कॅश व्हॅनला अडवून हा गुन्हा केला. संपूर्ण घटना फ्लाय ओव्हरवर घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान CMS Info Systems ची कॅश व्हॅन JP नगरमधील HDFC बँकेतून तीन बॉक्स कॅश घेऊन HBR Layout कडे जात होती. त्याचवेळी जयानगरमधील अशोका पीलरजवळ दोन गाड्यांनी कॅश व्हॅनला अडवले. व्हॅनमध्ये चालक बिनोद कुमार, आफताब, गनमॅन राजन्ना व तमैह असे एकूण चार कर्मचारी होते. हॅचबॅकमधून उतरलेल्या तीन जणांनी आम्ही “RBI अधिकारी आहोत” असा बनाव करत CMS स्टाफला भ्रमित केले. कंपनीविरुद्ध तक्रार असल्याचे सांगत त्यांनी व्हॅन तपासण्याचे नाटक केले. या विश्वासामुळे दोन गनमॅननी आपली शस्त्रे बाजूला ठेवली आणि त्यानंतर दरोडेखोर व्हॅनमध्ये प्रवेश केला. मग ड्रायव्हरला गाडी डेरी सर्कल फ्लायओव्हरवर नेण्यास सांगण्यात आले—हे ठिकाण ३ किमी अंतरावर होते. RBI अधिकाऱ्यांची वाट पाहा, असा बहाणा करून फ्लायओव्हरवर व्हॅन उभी करण्यात आली. ही बनावट अधिकाऱ्यांची गाडी त्यांना सतत फॉलो करत होती. निमहानस जंक्शनजवळ पोहोचल्यावर, दरोडेखोरांनी CMS स्टाफला गाडी सोडून जवळच्या सिद्दपुरा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. कॅश बॉक्स आम्ही RBI मध्ये जमा करतो” असा बनाव त्यांनी केला. CMS स्टाफ पायी पोलीस ठाण्याकडे निघाले. ड्रायव्हर कुमार व्हॅनसह फ्लायओव्हरवर उभा राहिला. याचवेळी दरोडेखोरांची इनोव्हा गाडी आलेली पाहून लगेच गनपॉईंटवर ड्रायव्हरला रोखले आणि तीनही कॅश बॉक्स त्यांच्या गाडीत टाकून काही क्षणातच पसार झाले.