वाव संघटनेतर्फे १५६ महिलांना मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वितरण; रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते लाभार्थींना साहित्य वाटप
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने WOW (वाव) संघटनेच्या वतीने सोलापूरमध्ये १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे
वितरण करण्यात आले. कुमठा नाका येथील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या
प्रांगणात आयोजित कार्यक्रमात भाजपाच्या शहर अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी
तडवळकर यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
प्रत्येक लाभार्थीला भरलेला गॅस सिलेंडर, शेगडी, रेग्युलेटर
आणि रबर ट्यूब देण्यात आली.
कार्यक्रमाला नगरसेवक शिवाजीराव वाघमोडे, सात्विक बडवे, वैदाबानो भंडाले, दत्तात्रय बडगू, आश्विनी चव्हाण, आनंद भवर, माजी नगरसेविका लता फुटाणे, व्यंकटेश कोंडे, शिवानंद कावडे, ऋतुजा आंदेली, अफरीन पटेल, अर्जुन
जाधव, नडगिरी, यशोदा सोनवणे, किसन गरजे, जगन्नाथ चव्हाण, नवले
सर, लक्ष्मण सातपूते, सिद्धेश्वर रूपनर,
सी.ए. बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या
प्रारंभी गॅस एजन्सीच्या प्रवर्तक विद्या लोलगे यांनी उपस्थितांचे स्वागत
करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महिलांना धुरापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि स्वच्छ इंधनाचा वापर
वाढवण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवत आहे. तसेच योजनेतील लाभार्थी महिलांच्या
खात्यात प्रत्येक गॅस सिलेंडरमागे ₹३०० अनुदान जमा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार व्यवस्थापक शिवाजी
थीटे आणि कुमार नक्का यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या
यशस्वी आयोजनासाठी नम्रता जाधव, अर्चना अवर, अबू
काझी, अमित कुलकर्णी, अभिजीत राजपूत,
किरण राजपूत आणि श्रीपाद परलेकांडा यांनी
विशेष परिश्रम घेतले.