अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेकडून अभिवादन; महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून पुष्पहार अर्पण
सोलापूर : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम
आयोजित करण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील त्यांच्या
पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयामधील प्रतिमेस महापौर विनायक
कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला जंगम, भाजप
शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक विनोद
भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेविका
कल्पना कदम, नगरसेवक समाधान आवळे, सुरेश
पाटोळे, मधुसूदन जंगम, नागेश खरात,
विशाल माने, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षात लोखंडे,
क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, लष्कर मातंग समाजाचे अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड, ॲड.
शैलेश पोटफोडे, श्रीकांत बोराडे, राजू
क्षीरसागर, लखन गायकवाड यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा
गौरव केला. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने कायम जपावा आणि सामाजिक समतेचा
संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.