सोलापूर युवक कॉंग्रेस कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धीरेंन्द्र शास्त्रीचा चा निषेध
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल
कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात युवक काँग्रेसने तीव्र निषेध
नोंदवला. खासदार प्रणिती शिंदे आणि युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी
“चले जाव” अशा घोषणा देत मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने
कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
निर्माण झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, शांभवी शुक्ला, प्रथमेश आबनावे यांच्यासह इतर
पदाधिकाऱ्यांनी केले. युवक काँग्रेसकडून आरोप करण्यात आला की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य
करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, यामुळे संताप वाढला आहे.