महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महापालिका तर्फे अभिवादन
सोलापूर : पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. सुपर
मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास तसेच कॉन्सील हॉल येथील महापौर
कार्यालयातील प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक
सत्यजित वाघमोडे, नगरसेविका कल्पना कदम, सारिका खजुरगी, तसेच प्रशांत पल्ली, सिद्धेश्वर कमटम, विजय चिप्पा, महेश देवकर, संतोष कदम उपस्थित होते. तसेच सहायक
आयुक्त (समाज कल्याण) सुलोचना सोनावणे आणि कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार
खानसुळे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा
फुले यांच्या सामाजिक कार्याची आठवण करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे
आवाहन यावेळी करण्यात आले.