खा. धैर्यशील माने शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख ; ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी

शिवसेना (शिवसेना (एकनाथ शिंदे गट)) कडून राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रहार पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.