सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या; बार्शीत धक्कादायक घटना

सोलापुर : जिल्ह्यातील बार्शी  शहरात सुनेच्या जाचाला कंटाळून एका वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्जेराव शंकर नायकुडे (वय ७३) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून ते उपळाई रोड परिसरात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे बार्शीतील ‘वसुंधरा’ बंगल्यात वास्तव्यास होते. त्यांच्या सुनेने वारंवार अपमानित करत मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तुला घरातून हाकलून देईन…’

फिर्यादी Mahesh Naykude यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाऊ उमेश याची पत्नी Sarika Umesh Naykude ही गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणांवरून सर्जेराव नायकुडे यांचा अपमान करत होती. तुला घरातून हाकलून देईन’ अशी धमकी देत ती त्यांना सतत मानसिक त्रास देत होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सततच्या अपमानामुळे सर्जेराव नायकुडे मानसिक तणावाखाली होते. या त्रासाला कंटाळून मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

सुनेविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी महेश नायकुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून Barshi City Police Station येथे आरोपी सून सारिका उमेश नायकुडे हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक Makane करत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.