भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२ जणांचे रक्तदान, समाजसेवेचा आदर्श उपक्रम
सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही जिझस ख्राईस्ट गॉस्पल सोसायटी यांच्या
वतीने ख्रि.पा. राजू जंगम यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
९२ रक्तदात्यांचा सहभाग
या रक्तदान शिबिरात तब्बल ९२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत
सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा संदेश दिला. विविध समाजघटकांतील नागरिकांनी या
उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, प्रा. नरसिंग असादे यांच्यासह संजय
हेमगड्डी, हणमंतू सायबोलू, समर्थ मोठे
आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वयंसेवकांचे योगदान
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तंबोळू, संजीव मोरे, जॉन दिनकर, निरंजन
उजागरे, सुरेश यांसह अनेक सेवक व स्वयंसेवकांनी मोलाचे
योगदान दिले. चर्च पदाधिकाऱ्यांमध्ये सागर तंबोळू, अशोक
तंबोळू, परेश कुणशीकर, लाजर सातलोलू,
देवपुत्र सायबोलू, बाळू मोटपेरोलू, संदेश जंगम यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व समाजघटकांचा सहभाग
या शिबिराला ख्रिस्ती समाजासह मोची समाज आणि इतर विविध
समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, ज्यामुळे सामाजिक ऐक्याचा संदेश अधोरेखित झाला.