सोलापुरात संविधान भवन अभ्यासिका केंद्राच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे पूजन संपन्न
सोलापूर : शहरातील बुधवार पेठ, मिलिंद नगर परिसरात जी.एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ‘संविधान भवन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्रा’च्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे पूजन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे पूजन सोलापूरचे महापौर Vinayak Kondyal आणि स्थायी समिती अध्यक्षा Ranjita Chakote यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या विचारांचा उल्लेख करत, या अभ्यासिका केंद्राच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या अभ्यासिका केंद्रात स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC, MPSC) मार्गदर्शन, अद्ययावत ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि अभ्यासासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.कार्यक्रमात जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या कार्याचेही विशेष कौतुक करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संस्थेचे विश्वस्त शशिकांत (पप्पू) गायकवाड, सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी तसेच इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.