सोलापुरात मनसेचे आंदोलन; अशोक खरातविरोधात शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत निषेध

सोलापूर :  सोलापुरात भोंदू बाबा प्रकरणामुळे संतापाचे वातावरण कायम असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. विकृत भोंदू बाबा अशोक खरात  याच्या विरोधात चार हुतात्मा चौक येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी खरातच्या पोस्टरला शेणाच्या गोवऱ्या खाऊ घालत निषेध व्यक्त केला. तसेच जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. राज्यभर संतापाची लाट अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन आणि निषेध सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातही मनसे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. नेतृत्व आणि सहभाग या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते. तीव्र निषेध आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत सरकारविरोधातही घोषणाबाजी केली.