RCB कडून अनोखी श्रद्धांजली; विराट कोहलीसह सर्व खेळाडू ११ नंबरची जर्सी घालणार
बंगळुरू : Indian Premier League 2026 हंगामाच्या पार्श्वभूमीवर Royal
Challengers Bangalore (RCB) संघाने एक भावनिक आणि अनोखा निर्णय
घेतला आहे. संघातील Virat Kohli याच्यासह सर्व खेळाडू सराव
सत्रादरम्यान ११ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.
११ चाहत्यांना श्रद्धांजली
गत हंगामात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या
दुर्घटनेत ११ चाहत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या चाहत्यांच्या स्मरणार्थ RCB संघाने
हा निर्णय घेतला आहे.
संघाचे CEO राजेश मेनन यांनी सांगितले की, “हे चाहते आमच्या प्रवासाचा कायम भाग राहतील. त्यांच्या स्मरणार्थ ही छोटी
श्रद्धांजली आहे.”
११ सीट्स कायम राखीव
या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्टेडियममध्ये ११ सीट्स कायमस्वरूपी राखीव
ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच सामन्यांपूर्वी प्रवेशद्वाराजवळ स्मारक
पट्टा उभारला जाणार आहे.
सुरक्षा उपाययोजना कडक
कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि RCB व्यवस्थापनाने सर्व सुरक्षा नियम आणि SOP चे पालन केल्याचे स्पष्ट केले आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या
सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे.
IPL 2026 ला 28 मार्चपासून
सुरुवात
दरम्यान, IPL 2026 चा 19वा हंगाम 28
मार्चपासून सुरू होणार असून उद्घाटन सामन्यात RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे.