सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर : शहरातील अक्कलकोट रोड आणि होटगी रोड औद्योगिक
वसाहतींमध्ये विकासकामांसाठी राज्य सरकारकडून ५६ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब
म्हणून मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार
परिषदेत दिली. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत सुविधांचा अभाव
होता. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सहकार्य केल्याचे आमदार
कोठे यांनी सांगितले. या निधीमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची
कामे वेगाने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळून
सोलापूरच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास
व्यक्त करण्यात आला. या पत्रकार परिषदेस महापौर विनायक कोंड्याल, पेंटप्पा गड्डम आणि राजू राठी उपस्थित होते.