ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय करणकोट यांचे निधन

सोलापूर : शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय करणकोट यांचे आज दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून ते वृत्तपत्र विक्री व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या सेवेमुळे शहरातील वृत्तपत्र वितरण क्षेत्रात त्यांचा विशेष मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघून पद्मशाली स्मशानभूमी येथे पार पडली. यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने सोलापूरातील वृत्तपत्र वितरण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.