भाजप स्थापना दिन साजरा; नगरसेवकांच्या अनुपस्थितीची चर्चा
सोलापूर : भारतीय जनता पक्ष चा स्थापना दिवस ६
एप्रिल रोजी सिव्हिल चौक येथील पक्ष कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या
कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी
आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, महापौर विनायक कोंड्याल,
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते
नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष
इंद्रजीत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना
जयकुमार गोरे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा
कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे. कार्यकर्ते तळागाळात जाऊन नागरिकांच्या समस्या
सोडवतात, त्यामुळेच पक्षाला मोठे यश मिळाले आहे.” मात्र,
या कार्यक्रमाकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला
मिळाले. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली
आहे.