१० वर्षांची अविरत रक्तदानाची परंपरा; माणुसकीचा अखंड वारसा जपण्याचा उपक्रम
सोलापूर : विविध सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे पश्चिम
महाराष्ट्र उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडगळे यांच्या वाढदिवसानिमित्त
सोलापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोफत नेत्र
तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर तसेच महिला आणि ज्येष्ठ
नागरिकांसाठी एसटी पास शिबिर घेण्यात आले.
या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदानातून माणुसकीचा संदेश
गेल्या १० वर्षांपासून रक्तदानाचा उपक्रम सातत्याने
राबविला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. रक्तदानाच्या माध्यमातून
गरजू रुग्णांना मदत करण्यासोबतच समाजात माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या
उपक्रमातून करण्यात आला.
नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शिबिरामध्ये
नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या नागरिकांसाठी मोतीबिंदू
शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
एसटी पास काढण्याचे शिबिरही आयोजित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला डॉ. जयप्रकाश कोठे, एमआयएमचे जिल्हाप्रमुख शौकत पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे
प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे यांची
प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संस्थापक समीर पांडगळे, अध्यक्ष यश चंदनशिवे यांच्यासह शेखर बडगेरी, महादेव
गायकवाड, महादेव तोरणे, राहुल कडलाख,
दयानंद बाळशंकर, सागर थोरात, पप्पू कांबळे, अविनाश चंदनशिवे, संतोष बाळशंकर, रोहित गायकवाड, टायगर पांडगळे, सोन्या किरतकुडवे, सचिन तोरणे, विशाल मोरे, सचिन
बडगेरी, योगेश शिंदे, मंगेश पांडगळे,
निकेतन बनसोडे, पृथ्वीराज बाळशंकर, अस्लम शेख, आकाश बनसोडे, अनिकेत
रेड्डी, धनराज मस्के, महेश आडगळे,
राजू सुरवसे, धनराज रेड्डी, सुजित राजगुरू आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.