भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी SIT स्थापन; २०० कोटींची संपत्ती, आक्षेपार्ह व्हिडिओ समोर
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे चर्चेत
आलेल्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे SIT प्रमुखपदाची
जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अनेक आक्षेपार्ह
व्हिडिओ आणि फोटो लागले असून, या प्रकरणात अनेक सेलेब्रिटी
आणि राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याची चर्चा आहे.
२०० कोटींच्या संपत्तीचा अंदाज पोलीस तपासात अशोक खरात
याने राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी आणि इतर प्रभावशाली
व्यक्तींना जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे समोर आले आहे. नाशिक
शहर आणि सिन्नर येथे आलिशान बंगले, मीरगाव येथे फार्महाऊस
तसेच विविध ठिकाणी जमिनी, सोने-चांदी, मौल्यवान
वस्तू आणि दोन महागड्या कार असा एकूण सुमारे २०० कोटी रुपयांचा मालमत्तेचा अंदाज पोलिसांनी
व्यक्त केला आहे.
डिजिटल फॉरेन्सिक तपासावर भर SIT कडे तपासाची सूत्रे गेल्यानंतर डिजिटल फॉरेन्सिक तपासावर विशेष भर दिला
जाणार आहे. पोलिसांना मिळालेल्या ५८ व्हिडिओंमधील पीडितांना न्याय देणे, कॉल रेकॉर्ड्स तपासणे, तांत्रिक पुरावे गोळा करणे,
आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे आणि संभाव्य सहकारी आरोपींचा शोध
घेणे, अशी तपासाची दिशा असेल. तसेच खरातने इतकी मोठी संपत्ती
कशी आणि कोणत्या स्रोतांतून जमा केली, याचाही सखोल तपास केला
जाणार आहे.
ब्लॅकमेलिंगचा संशय या प्रकरणात नीरज जाधव नावाच्या
व्यक्तीचीही भूमिका समोर आली आहे. तो खरातकडे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता.
तक्रारदार तरुणीच्या माहितीनुसार, तो बनावट अश्लील फोटो व्हायरल करण्याची
धमकी देत होता. याच व्यक्तीकडून खरातलाही ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय
पोलिसांना आहे.
राजकीय प्रतिक्रिया दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आरोपी
अशोक खरातच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर असल्याने
त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या
नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.