सोलापुरात खान चाचा हॉटेलसमोर अपघात; दुचाकीस्वार जखमी
सोलापूर : शहरातील
खान चाचा हॉटेलसमोर दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी
झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार आदिल मरेड्डी (वय २५) हे जखमी
झाले आहेत. ते अक्षरा हॉस्पिटल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, कार
चालक सचिन कोल्हापुरे (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांच्या
कारची दुचाकीला धडक लागल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ गर्दी
झाली होती. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप
मिळालेली नाही. घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.