श्री कालिका देवी चैत्र पंचमी महोत्सव उत्साहात संपन्न

सोलापूर : विश्व ब्राह्मण समाजकारिता सेवा मंडळ ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने आयोजित श्री कालिका देवी चैत्र शुद्ध पंचमी महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवात समाजबांधवांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.

रविवारी सकाळी ८ वाजता उत्सव मूर्ती स्थापना व ग्रंथपूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी श्री दुर्गा सप्तशती पाठ यासाठी सौ. प्रतिभा नागेश महामुनी, सौ. शैलजा नागेश कुरुलकर आणि सौ. रेखा जोशी यांनी मार्गदर्शन केले. दररोज सकाळी ८ वाजता नित्य पूजा नागेश वसंतराव कुरुलकर यांच्या हस्ते पार पडली. महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शुक्रवारी कुंकुमार्चन, सोमवारी रुद्राभिषेक आणि रविवारी नवचंडी यांसारखे कार्यक्रम उत्साहात पार पडले. सोमवारी श्री कालिका देवीची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महाआरती श्री व सौ. प्रसाद बाळासाहेब कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष उमेश रंगनाथ कुरुलकर, उपाध्यक्ष सचिन सुभाष आष्टीकर, खजिनदार नागेश वसंतराव कुरुलकर, सचिव कालिदास काशिनाथ कुंभारीकर, सहसचिव सत्यजित सुधाकर कुरुलकर, विश्वस्त पुरुषोत्तम रंगनाथ कुरुलकर, प्रसाद बाळासाहेब कुमठेकर, जितेंद्र विश्वंभर वेदपाठक, संतोष औदुंबर कळमनकर, प्रसाद नानासाहेब चोळचगुड्डू यांच्यासह अनेक पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, या महोत्सवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.