शिवजन्मोत्सव महामंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला पद्माकर नाना काळे, श्रीकांत डांगे, राजन भाऊ जाधव, मतीन बागवान, सुशील बनपट्टे, जयवंत सलगर, अंबादास शेळके, प्रकाश ननवरे, ब्रह्मदेव पवार, महादेव गवळी, जितू वाडेकर, जीवन यादव, सदाशिव पवार, दादा सुरवसे, नागेश वडणे, विजय भोईटे, विजय भोसले, संदीप साळुंखे, देविदास घुले, बाबू बनसोडे, मारुती सावंत, नितीन मोहिते, नगरसेविका मृणाल गवळी, लक्ष्मण महाडिक आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधान निर्मितीतील योगदानाची आठवण करून त्यांचे विचार
आत्मसात करण्याचा संदेश दिला.