आमदार देवेंद्र कोठे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी विकासकामांवर चर्चा; सन्मान करून व्यक्त केला विश्वास

सोलापूर : शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची सदिच्छा भेट घेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीत सोलापुरातील आयटी पार्क, शहरातील दोन उड्डाणपूल, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक तसेच कामगार व सोसायटी संदर्भातील ‘बी टू’ प्रश्न आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सोलापूरमधील प्रलंबित विकासकामांना गती देत अल्पावधीत नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त केला. आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा विकास वेगाने सुरू असून, नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा वेग अधिक वाढेल.

युवा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी
सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी युवा असल्याचे सांगत, सर्वांनी एकत्रितपणे काम करत शहराच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी आमदार कोठे यांनी व्यक्त केला.

सन्मानाने स्वागत
नूतन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी एस. कार्तिकेयन यांचा ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर यांची मूर्ती आणि सोलापुरी टॉवेल देऊन सन्मान केला.

या भेटीस गुरुशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते.