बसव जयंतीनिमित्त ‘बसव सप्ताह’ची सुरुवात; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश

सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ‘बसव सप्ताहा’ची सुरुवात यंदा वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाने करण्यात आली. सिद्धेश्वर मॉर्निंग वॉकिंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाट येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नैसर्गिक वातावरणात पार पडला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रवीण पटणे, एम. के. पाटील, सोमनाथ भोगडे, नगरसेवक अमर पुदाले, शिवकुमार पाटील, सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त एस. एम. पाटील, बिपिन धुम्मा, संजय शिंदे, अमोल कटके, महेंद्र सोमशेट्टी, बसव जन्मोत्सव अध्यक्ष लक्ष्मीकांत बिराजदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच सिद्धेश्वर मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे अध्यक्ष गुरुशांत कलशेट्टी, सुनील शरणार्थी, नागेश पाटील, अमर पंपटवार, लक्ष्मण दिगोंडा, शेटजी मलेश पुरवंत, शैलेश पुरवंत, आडव्याप्पा कडगंची, बसवराज धुप्पाद, थोरात, राचप्पा आरळीमार, शिवानंद बळोळी, मल्लिनाथ इमडे, लामतुरे साहेब, वेर्णेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी केले, तर आभार कैलास जेऊरे आणि सचिन कुलकर्णी यांनी मानले.