आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात भीमसैनिकांची गर्दी; मान्यवरांकडून अभिवादन

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहाजी पवार, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, रोहिणी तडवळकर, चेतन नरोटे आदींची उपस्थिती होती. विविध पक्षांचे नेते, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनीही आंबेडकरांना अभिवादन केले. समता सैनिक दल आणि शाक्य संस्थेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. याशिवाय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसतिगृह तसेच शेव गोविंदरावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही उत्साहात अभिवादन करत जयघोष केला. संपूर्ण वातावरण “जय भीम” घोषणांनी दुमदुमून गेले होते.