सोलापूर शहरात डीजे शिवाय मिरवणूक निघतील, पोलिसांची भूमिका स्पष्ट
सोलापूर : शहरात डीजेमुक्त मिरवणुका काढण्याबाबत
पोलिसांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गणेशोत्सवापासून सुरू झालेली
‘डीजेमुक्त सोलापूर’ मोहीम यापुढेही कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त एम.
राजकुमार यांनी सांगितले. शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना
डीजेविना उत्सव साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणुका पारंपरिक
पद्धतीने काढाव्यात, असा पोलिसांचा आग्रह आहे. कायद्याचे
उल्लंघन केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच
त्याचा थेट परिणाम संबंधितांच्या करिअरवर होऊ शकतो, असा
इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावेत
यासाठी ही मोहीम राबवली जात असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे
आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.